[email protected]

(02550)233439, 233438

मातृभाषा दिवस

                                                         शैक्षणिक वर्ष -2019-20 

          के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी येथे मराठी विभागातर्फे शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२० रोजी सेमिनार हॉल मध्ये मातृभाषा दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         मातृभाषेचा प्रसार व्हावा,त्याचबरोबर देशातील भाषिक आणि सांस्कृतिक परंपरा याबाबत जागरूकता व्हावी या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मातृभाषेविषयी आदर व्यक्त केला. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी I  या उक्तीप्रमाणे  जननी, जन्मभूमी आणि जन्मभाषा हे निसर्गाने प्रत्येकाला बहाल केलेले वैभवच आहे,म्हणूनच यांचे ऋण आपण फेडले पाहिजे. सामाजिक,अध्यात्मिक विचार ही मराठीची ताकद आहे. मातृभाषेतून सुसंवाद झाला तर या विचारांची शक्ती वाढेल व जनसामान्यांमध्ये प्रसारही होईल,हा विचार विद्यार्थ्यामध्ये रुजविण्यात आला.याप्रसंगी  विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे मराठीभाषेच्या समृद्ध परंपरेची माहिती देण्यात आली. मराठी भाषेचा प्राचीन इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

         महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचनकक्ष येथे मराठी भाषेतील विविध विषयांवरील पुस्तकांचे खुले प्रदर्शन भरविण्यात आले. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश कसे हाताळावे,याविषयी प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. मराठी विभागप्रमुख डॉ. ए. एस. ठोके यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. मनिषा गुंडगळ यांनी केले.