[email protected]

(02550)233439, 233438

मराठी भाषा पंधरवडा

                                                        शैक्षणिक वर्ष -2019-20

   के.के.वाघ शिक्षणसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने के.के.वाघ शिक्षणसंस्था संचलित, के.के.वाघ कला,वाणिज्य,विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय,चांदोरी येथे मराठी विभागाच्या वतीने ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ चे औचित्य साधून व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘मराठी भाषेची समृद्ध परंपरा’ या विषयावर ज्ञानेश्वरीचे अभ्यासक व माजी प्राचार्य शिवाजी कचरू नाठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाषेची आवड असणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. वाचायचं असेल तर वाचलंच पाहिजे. मोबाईल, इंटरनेट, या सर्वोत्तम साधनातून ज्ञानाची दरवाजे खुली झाली आहेत,पण त्याचा योग्य रीतीने वापर करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी यांसारख्या प्राचीन ग्रंथातील ओव्यांतील अर्थ त्यांनी उलगडून दाखविला. उत्तम संवाद साधण्यासाठी संवादाची भाषा शिकणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मराठी भाषेची समृद्ध परंपरा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, मराठी भाषेची सुरुवात श्रवणबेळ्गोळच्या शिलालेखापासून झाली असून महानुभाव वाङ्मयातून ग्रंथसाहित्य निर्माण झाले. मराठी भाषेला मोठा इतिहास आहे हे सांगतांना त्यांनी मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली हे उदाहरणातून पटवून दिले.

         मराठी भाषा,मराठी भाषेतील साहित्य,मराठी कविता,मराठीतील साहित्यिकांचे साहित्यलेखन इ. विषयावर विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रिका तयार केल्या. तसेच ‘मी हिरकणी बोलतेय’ या विषयावर लेख लिहून विद्या पगारे हिने आजच्या स्त्रीचे जीवन चित्रित केले,यावेळी निफाड कारखान्यातील कामगार नेते मा.श्री.के. डी.मोरे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे अनावरण करण्यात आले होते..महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरुण ठोके यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर भाष्य करून भाषा विषयक अभिरुची विकसित करण्यासाठी श्रेष्ठ साहित्यकृतींचे वाचन केले पाहिजे असे म्हटले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. मनीषा गुंडगळ यांनी करून दिला. प्रा. नितीन जाधव यांनी आभार मानले. विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. देविदास दुर्गेष्ट यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कु. राजश्री गायकवाड व कु. विद्या पगारे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी संगणक विभाग प्रमुख प्रा. बाळू चौधरी, डॉ. सविता सावंत प्रा. भगवान बैरागी, प्रा. तुषार बागुल, प्रा. सिमा आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त  प्रतिसाद लाभला.